सखी
सगळ्यांच्या आयुष्यात एक सखी असते
दूर असूनही ती जवळचीच वाटते
मनाच्या कोपऱ्यात ती सदैव असते
संपूर्ण जीवनच ती व्यापून टाकते
सगळ्यांच्या आयुष्यात एक सखी असते.
नात्यांच्या गर्दीत तीच सख्खी वाटते.
खळाळून हास्य तीच ओठी आणते
तीच चुकलेली गणितं सहज सोडवते
मनातल्या गाठीही तीच उलगडते
सगळ्यांच्या आयुष्यात एक सखी असते.
प्रत्येक वळणांवर तीच साथ देते
आवेगाने हसणे रडणे तिच्याजवळच होते
प्रसंगी जोडीदारापेक्षाही जिवलग वाटते
सगळ्यांच्या आयुष्यात एक सखी असते.
डॉ. सुमेधा हर्षे , अकोला.
No comments:
Post a Comment